आयटीआय विद्यार्थ्यांचा तातडीने निकाल जाहीर करावा
आमदार राजूमामा भोळेंसह जिल्हाधिकार्यांकडे विद्यार्थ्यांची मागणी
जळगाव : आयटीआय विद्यार्थ्याचा तातडीने निकाल जाहीर करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत तसेच जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आधीच कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा मोठा कालावधी वाया गेला असून त्यातच आता अनेक ठिकाणी जागा निघाल्याने निकाल जाहीर झाल्यास विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकणार आहे, असेही निवेदनात नमूद आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर अन्वर शेख, प्रशांत भट, प्रथमेश बाबर, विकी सोनकत, विकी ढगे आदींच्या स्वाक्षर्या आहेत. मागणीसंदर्भात दखल घेण्याचे आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.





