पुन्हा कोरोना विस्फोट : जळगाव जिल्ह्यात आढळले तब्बल 414 बाधीत


जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना सुसाट वेगाने पसरत आहे. जळगावसह भुसावळ रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने ही शहरे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. जिल्ह्यात शुक्रवार, 21 जानेवारी रोजी एकाच दिवसात तब्बल 414 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. भुसावळसह जळगावात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

नव्याने एका रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 581 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 47 हजार 119 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 41 हजार 312 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. शुक्रवारी 221 रुग्णांनी कोरोनावर मात केली.






या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 114
जळगाव ग्रामीण 11
भुसावळ 79
अमळनेर 20
चोपडा 78
पाचोरा 17
भडगाव 05
धरणगाव 04
यावल 01
एरंडोल 04
जामनेर 32
रावेर 00
पारोळा 16
चाळीसगाव 29
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 02

भुसावळातील कोरोनावाढीचे हे समोर आले कारण
रेल्वेमुळे देशभरातील प्रवाशांचा भुसावळ शहरासोबत थेट संपर्क येतो. त्यामुळे शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने मुसंडी मारली आहे. तिसर्‍या लाटेतील पहिल्या रुग्णाला रेल्वेची ट्रॅव्हल हिस्ट्री होती. सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 50 ते 52 टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्णांना ट्रॅव्हल्स हिस्ट्री आहे. त्यापैकी काही रुग्ण रेल्वे संबधीत विभागातील बाधितांच्या संपर्कात आले आहेत. शहरातील दाट लोकवस्ती, नियमांकडे दुर्लक्ष यामुळेही रुग्णसंख्या वाढत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !