शिरसोलीजवळ हृदयविकाराच्या एकाचा मृत्यू


जळगाव : शहरातील हरीविठ्ठल नगरातील सुरेश गावडे यांचे शनिवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास म्हसावदला जात असताना हृदयविकाराने निधन झाले. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

एमआयडीसी पोलिसात नोंद
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीविठ्ठल नगर येथील सुरेश गावडे (56) यांचे वाघनगर परिसरात चहा नाश्त्याचे हॉटेल आहे. शनिवार, 22 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुरेश गावडे हे त्यांची विवाहित मोठी मुलगी वर्षा हिला भेटण्यासाठी त्यांच्या (एम.एच. 19 ए.टी. 4299) या क्रमांकाच्या दुचाकीने म्हसावद येथे जात होते. यादरम्यान शिरसोली जवळ मारुतीच्या मंदिराजवळ त्यांच्या छातीत कळा यायला लागल्या. छातीत दुखत असल्याने त्यांनी दुचाकी थांबविली व ते मंदिरावर थांबले. याचठिकाणी काही वेळातच मृत्यू झाला. मंदिराजवळ असलेल्या वेफर व्यावसायिकाने मयत हे सुरेश गावडे असल्याची ओळख पटवित, त्यांच्या शिरसोली येथील नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.






एमआयडीसी पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडी पोलिसांनीही घटनास्थळ गाठले व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. मयत सुरेश गावडे यांच्या पश्चात दोन मुले महेंद्र व दीपक तसेच सूना, सोनल व मनिषा तसेच तीन नातंवडे असा परीवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !