दोन बसेस फोडल्या : पारोळा-धुळे रस्त्यावरील घटना


जळगाव : पारोळा-मुकटी धुळे रस्त्यावर जळगाव आगाराच्या दोन बसेसवर दगडफेक झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत बसचा समोरील काच फुटून चालक गंभीर जखमी झाला आहे.

अज्ञातांनी केली दगडफेक
बस क्रमांक (एम.एच.20 बी.एल.4097) ही जळगाव ते धुळे या मार्गावर विचखेडा या गावाजवळ धावत असताना मोटरसायकल क्रमांक 0785 वरील दोन व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने सदर बसवर दगडफेक फेकून मारला. या दगडफेकीत बसचा समोरील काच फुटून चालक संजय गोविंद रंधे (चालक क्रमांक 2880) यांना दुखापत झाली.






अन्य दुसर्‍या बसवरही दगडफेक
काही वेळातच याच ठिकाणी जळगाव आगाराची दुसरी बस (क्रमांक एम.एच.20-3381) या धुळे येथून जळगाव जाणार्‍या बसवर दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास याच मोटर सायकलस्वार व्यक्तींनी दगडफेक केली. या दगडफेकीत बसचा काच फुटला आहे. बस चालक सोपान सपकाळे (क्रमांक 1358) यांनी प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला. या संदर्भात पारोळा पोलीस स्टेशन मध्ये संशयित मोटरसायकलस्वार विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूराव पाटील करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !