मुंबईच्या विवाहितेचा आठ लाखांसाठी छळ


जळगाव : मुंबईतील विवाहितेला माहेरुन फ्लॅट घेण्यासाठी 8 लाख रुपये आणावेत या कारणावरुन छळ करणार्‍या पतीसह दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा
सुनयना सुधीर खरे (29) यांचा सुधीर भास्कर खरे (सानपाडा, नवी मुंबई, ता.ठाणे) यांच्यासोबत विवाह झाला आहे. 16 नोव्हेंबर 2019 ते सप्टेंबर 2020 यादरम्यान वेळोवेळी सुधीर खरे यांनी सुनयना यांना माहेरुन 8 लाख रुपये फ्लॅट घेण्यासाठी आणावेत, अशी मागणी केली. सुनयना यांनी पैसे आणले नाही, त्याचे वाईट वाटल्याने सुधीर खरे यांनी सुनयना यांना दारुच्या नशेत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करत धमकी दिली तर सुधीर यांचा मामेभाऊ कुलदीप देवराम बाविस्कर (रा.पाचोरा, जि. जळगाव) यानेही सुनयनाबद्दल तिचे पती सुधीर याच्याजवळ चुगल्या लावून शारिरीक व मानसिक त्रास दिला. अशा आशयाच्या सुनयना यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी सुधीर खरे व कुलदीप बाविस्कर या दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहेत.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !