धूम स्टाईल तरुणाचा मोबाईल लांबविला


जळगाव : शहरातील सिंधी कॉलनी परीसरातून पायी जाणार्‍या तरुणाच्या हातातून 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
अमित नरसिंग पावरा (27, रा.एम.जे.कॉलेजजवळ, जळगाव) हा तरुण रविवार, 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीकडून कंजरवाडाकडे पायी जात असताना त्याच्या मागून अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन तरूणाच्या हातातील 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल झटका मारून बळजबरीने हिसकावून लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री 10 वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन चोरट्यांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !