अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले : चाळीसगावातील घटना


चाळीसगाव : शहरातील एका भागात राहणार्‍या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेण्यात आले. या प्रकरणी पोलिसात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
चाळीसगाव शहरातील एका भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने पळवून नेल्याची घटना 22 जानेवारी रोजी दुपारी 2.25 वाजेच्या सुमारास उघडकीला आली. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. घरच्यांनी परीसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली असता ती मिळून आली नाही. याबाबत चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !