दाम्पत्याला दगड मारून दुखापत करणारा संशयीत पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : शहरातील नवीन जोशी कॉलनी परीसरात दाम्पत्याला शिवीगाळ करीत दगड मारून दुखापत करणाऱ्या गिरीष अशोक गायकवाड (नवीन जोशी कॉलनी) याला सोमवार, २४ जानेवारी रोजी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
शिविगाळ करत दगड मारल्याचा आरोप
६ ऑक्टोबर २०१५ रोजी संशयीत आरोपी गिरीष गायकवाड याचा पाळीव कुत्रा हा सुरेश मधुकर गायकवाड (रा. नवीन जोशी कॉलनी) यांच्या रीक्षात बसलेला होता. त्यावेळी रीक्षा चालक सुरेश गायकवाड यांनी कुत्र्याला रीक्षातून हाकलले. याचा राग आल्याने हरीष गायकवाड याने सुरेश गायकवाड आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी शिविगाळ केली तर सुरेश गायकवाड यांना दगड मारून दुखापत केली. या प्रकरणी सुरेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी हरीष गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून हरीष गायकवाड हा शहरातून पसार होता. तब्बत सहा वर्षानंतर संशयीत आरोपी हा जळगावात आला असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार स.फौ. अतुल वंजारी, पो.कॉ. किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी सोमवार, २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संशयित आरोपी हरीष गायकवाड याला नवीन जोशी कॉलनी येथील राहत्या घरातून अटक केली..





