तलवार बाळगून दहशत निर्माण करणार्या तरुणाला अटक
जळगाव : शहरातील शनिपेठ हद्दीतील चौगुले प्लॉट परीसरात बेकायदेशीररित्या हातात तलवार घेऊन फिरणार्या तरूणाला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. संशयीताच्या ताब्यातील तलवार जप्त करण्यात आली. शनिपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
तलवारीच्या धाकावर दहशतीचा आरोप
शहरातील चौगुले प्लॉट परीसरात संशयीत आरोपी पंकज भानुदास चौधरी (24) हा हातात तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल राहुल घेटे, पोलिस नाईक बाविस्कर, पोलिस नाईक कांबळे, मुकुंद गंगावणे, राहुल पाटील यांनी रात्री 9 वाजता कारवाई करत संशयीत आरोपी पंकज चौधरी याला अटक केली. त्याच्या ताब्यात असलेली धारदार तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राहुल घेटे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.





