भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार


पहूर : भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. कार चालकाला पहूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जळगाव-औरंगाबाद या महामार्गावर पहूर-वाकोद दरम्यान हा अपघात झाला. शेख अन्सार (43, रा. वाकोद, ता.जामनेर) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शेख अन्सार हा मंगळवार, २५ जानेवारी रोजी पहूरकडून वाकोद येथे दुचाकीने जात असतांना समोरून येणारी कार (एम.एच. २० व्ही.बी.५०७७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत शेख अन्सार गंभीर जखमी झाले होते. त्याला पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्रकृती खालावल्याने खासगी रूग्णालयात दाखल केले असता मृत्यू झाला. दरम्यान, कार चालक अपघात ठिकाणी न थांबता फर्दापूर पोलिस स्टेशनला जमा झाला.₹ व त्यानेच १०८ ला कॉल करून अपघाताची माहिती दिल्याचे समजते.

आरोपी पहुर पोलिस स्टेशनच्या ताब्यात
फर्दापूर पोलिस यांनी पहूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून कार व कारचालकाला पहुर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !