पाच महिन्यांचे मृत अर्भक आढळले : आडगावची घटना


एरंडोल : पाच महिन्याचे मृत स्थितीत अर्भक तालुक्यातील आडगाव येथील एका प्लॉट भागात आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात महिलेचा पोलिसांकडून शोध
एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील एका प्लॉट भागात गर्भातील अंदाजे 5 महिन्याचे अर्भकाला अज्ञात महिलेने फेकून दिले होते. या परीसरात राहणारे लहान मुले खेळत असतांना हा प्रकार लक्षात आला. यावेळी नागरीकांनी मोठी गर्दी केली. गावातील पोलिस पाटील नितीन भुसारी यांनी धाव घेवून माहिती घेतली. पोलिस पाटील भुसारी यांनी कासोदा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे यांना घटनेची माहिती दिली. कासोदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. दरम्यान, गर्भातील साधारण पाच महिन्याचे अर्भक असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून पोलिस पाटील नितीन भुसारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार युवराज कोळी करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !