धक्कादायक : चोरट्यांनी जामनेरात एटीएम फोडले : 13 लाखांच्या रोकडवर डल्ला


जामनेर : चोरट्यांनी आपला मोर्चा एटीएमकडे वळवला असून जामनेर शहरातील पाचोरा रस्त्यावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडत सुमारे 12 लाख 78 हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. विशेष म्हणजे संपूर्ण चोरी करतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्री फोडले एटीएम
जामनेर शहरातील पाचोरा रोडवर असलेल्या आयडीबीआय बँकेचे एटीएम रात्रीच्यावेळी चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने फोडले. बुधवार, 26 जानेवारी रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास हे एटीएम फोडण्यात आले असून . अवघ्या 15 मिनीटात एटीएम मधील पैसे चोरण्यात आले त्यामुळे सराईत चोरट्यांनी ही कामे केल्याचा अंदाज आहे. एटीएम फोडल्याची माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला.






सीसीटीव्हीत चोरटे कैद
चोरीचा घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. सदर या बँकेच्या एटीएम जवळ कोणते प्रकारे सुरक्षारक्षक नसल्यामुळे एटीएममध्ये चोरी सहज शक्यत झाली. या प्रकरणी शाखाधिकारी प्रसुन परेशनाथ घोष (36, रा. जामनेर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !