दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : दुचाकी चोरट्याच्या एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी पहाटे कालिका माता परीसरातून अटक केली आहे. सॅलविन विरेंद्रसिंग ठाकूर (35, रा.गांधी नगर, गोपाल नगर, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

दुचाकी चोरीप्रकरणी दाखल होता गुन्हा
मंगल पुंडलिक पाटील (54, रा.श्रीराम समर्थ कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) हे गणपती घेण्यासाठी मुलगा सेजस पाटील यांच्यासह मोटरसायकल क्रमांक (एम.एच.19 बी.एक्स. 792) ने 22 ऑगस्ट 2020 सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एमआयडीसी परीसरातील तोल काटा जवळील हॉटेल निलांबरीजवळ आले होते. त्यांनी दुचाकी पार्किंगला लावून गणपती घेण्यासाठी गेले. गणपती घेऊन 6.30 वाजेच्या सुमारास पुन्हा पार्किंग लावलेल्या दुचाकीजवळ आले असता दुचाकी मिळून आली नाही, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरी भुसावळातील चोरटा सॅलवीन ठाकूरने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपीचा शोध सुरू होता. गुरूवार, 27 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता कालिंका माता परीसरात संशयीत आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. यापूर्वी या गुन्ह्यात मुकूंदा डिगंबर सुरवाडे या संशयिताला अटक केली होती.






यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, हवालदार संजय धनगर, विकास सातदिवे, हेमंत कळसकर, सुधीर सावळे, योगेश बारी, चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुढील तपास हवालदार संजय धनगर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !