जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना कोरोनाची लागण
जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (Jalgaon SP Pravin Mudhe) यांची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आली आहे. डॉ. मुंढे यांना गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी गुरूवार, 27 जानेवारी रोजी सकाळी कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक (Jalgaon SP Pravin Mudhe) पुढील काही दिवसांसाठी होम क्वारंटाईन झाले आहेत.





