जळगावातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी


जळगाव : शहरातील ममुराबाद रस्त्यावर 35 वर्षीय तरुणाचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरूणाच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. शेख गफ्फार शेख जब्बार (35, रा.उस्मानियॉ पार्क असे मयत तरूणाचे नाव आहे.

घातपाताने मृत्यू झाल्याचा संशय
शेख गफ्फार हे बांधकामाचे सेंटींग काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. आई-वडील, पत्नी, भाऊ व दोन मुलांसह शहरातील उस्मानिया पार्क येथे वास्तव्याला आहे. बुधवार, 26 जानेवारी रोजी सायंकाळी काम आटोपून घरी निघाले होते परंतु ते रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता कोठेही आढळून आले नाही. गुरूवार, 27 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील कोंबडी फार्मजवळ त्यांचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. त्यांच्या डोक्यावर, हनुवटीवर मार लागल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.






घटनास्थळी पोलिसांची धाव
जळगाव तालुका पोलिस आणि नातेवाईकांनी धाव घेतली व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व मित्र परीवाराने मोठी गर्दी केली होती. तरूणाचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !