चोरट्याने महिलेची सोनपोत लांबवली


जळगाव : शहरातील आसोदा रोड, मोहन टॉकीजवळ एका महिलेची 25 हजार रुपयांची मंगलपोत अज्ञात चोरट्याने लांबविली. या प्रकरणी जळगावच्या शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात चोर्‍या वाढल्या
छाया रतन बाविस्कर (38, रा.मोहन टॉकीजवळ, आसोदा रोड, जळगाव) या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गुरूवार, 27 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास छाया बाविस्कर या महिला घराच्या ओट्यावर बसलेल्या होत्या. त्यावेळी अंदाजे 40 वर्षीय वयोगटातील अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. तुमच्या घरात दोष असल्याचे सांगून घराच्या अंगणात पुजेच्या ठिकाणी सोन्याची पोत व कानातले बाही ठेवण्यास सांगितलेे. महिला घरात चहा-पाणी करण्यासाठी गेल्या असता पुजेसाठी ठेवलेले मंगलपोत आणि सोन्याची बाही असा एकूण 25 हजार रूपयांचा मुद्देमाल अनोळखी व्यक्तीने चोरून पसार झाला. महिलेने तातडीने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार, 27 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !