दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू : दाम्पत्य जखमी ; वाकीजवळ अपघात


जामनेर : शहरापासून काही अंतरावर असलेल्या हरिओम नगर जवळ दोघा दुचाकी वाहनांच्या अपघातात प्रशांत संजय पाटील (पाळधी) या तरुणाचा मृत्यू झाला असून तर नांद्रा प्र.लो. येथील सरपंच मिलिंद गांगुर्डे व त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत.

समोरा-समोर धडकल्या दुचाकी
वाकी गावालगत असलेल्या हरिओम नगर जवळ सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नांद्रा प्र.लो. येथील सरपंच व त्यांच्या पत्नी दुचाकीवर जामनेरकडे जात असताना त्यांच्या व समोरून जामनेरकडून पाळधी गावाकडे जाणार्‍या प्रशांत संजय पाटील यांच्या दुचाकीची समोरा-समोर धडक झाल्याने या अपघातात प्रशांत पाटील यांचा मृत्यू झाला असून नांद्रा येथील सरपंच व त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जामनेर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सदर तरुणाच्या मृत्यूप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !