कोरोना सुसाट : भुसावळात 45 तर जळगाव जिल्ह्यात नव्याने आढळले 374 रुग्ण


जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना सुसाट वेगाने पसरत असून दिवसागणिक वाढणार्‍या रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढतच आहे. जिल्ह्यात शुक्रवार, 28 जानेवारी रोजी एकाच दिवसात तब्बल 374 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. भुसावळसह जळगावात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

आतापर्यंत 2585 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 585 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 49 हजार 711 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 43 हजार 658 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. शुक्रवारी 467 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान एरंडोल तालुक्यातील 51 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.






या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 41
जळगाव ग्रामीण 16
भुसावळ 33
अमळनेर 43
चोपडा 79
पाचोरा 15
भडगाव 15
धरणगाव 09
यावल 31
एरंडोल 01
जामनेर 08
रावेर 10
पारोळा 06
चाळीसगाव 58
मुक्ताईनगर 01
बोदवड 00
अन्य जिल्हा 05


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !