बनावट मद्य निर्मिती : धरणगावातील मास्टरमाईंड गौतम माळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात


धरणगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बनावट मद्य निर्मिती प्रकरणाचा मास्टर माइंड गौतम माळीला शुक्रवारी गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गौतम माळीला (32, रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साई गजानन पार्क, धरणगाव) सुरूवातीला 25 जानेवारीला 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्यानंतर त्यास पुन्हा धरणगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची 1 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर उर्वरीत भूपेंद्र गोकुळ पाटील (29, रा.मराठे गल्ली, धरणगाव), कडू मराठे (40, रा.मराठे गल्ली, धरणगाव), भास्कर पांडुरंग मराठे (63, रा.साई गजानन पार्क, धरणगाव) या तिघा आरोपींची 1 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

दोन पथके संशयीताच्या मागावर
माळीचा ताबा घेण्यासाठी चार दिवसापासून धरणगावात गुजरात पोलिसांची दोन पथके ठाण मांडून होते. गौतमवर डेडीपाडा पोलिसांत 2017 मधील एका गुन्ह्याचा तर भरूच जिल्ह्यातील नटरंग पोलिस स्थानकात 3 गुन्हे आहेत. न्यायालयाने गौतमचा ताबा डेडीपाडा पोलिसांना दिला. दुसरीकडे नटरंग पोलिसांनी देखील गौतमचा ताबा हवा आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !