म्हसावदमध्ये ज्वेलर्स दुकान फोडले


जळगाव : तालुक्यातील म्हसावद (Mhasawad) येथील ज्वेलर्स दुकान ज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून 56 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात (jalgaon midc police station) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री चोरट्यांचा डल्ला
नाना तुकाराम सोनार (50, रा.वाणी गल्ली, म्हसावद) यांचे बोरनार रोडवर स्वाती ज्वेलर्स (swati jwelars) नावाचे दुकान आहे. नाना सोनार यांनी 23 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता दुकान बंद करून घरी गेले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्स दुकान फोडून दुकानातील सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून 56 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला तर सोमवार, 24 जानेवारी रोजी सकाळी चोरी उघडकीस आली. याबाबत ज्वेलर्स दुकानाचे मालक नाना सोनार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने शुक्रवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !