शाळकरी विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य : लासुरच्या आरोपीला सात वर्षांचा कारावास


चोपडा : शहरातील 13 वर्षाच्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी लासूरच्या आरोपीला न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा ठोठावली.

शाळकरी विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार
चोपडा शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेणारा 13 वर्षाचा पीडित मुलगा 26 मार्च 2018 रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास शाळेच्या मधल्या सुटीत शाळेच्या बाजूला असणार्‍या यापारी संकुलामधील दुकानात केक घेण्यासाठी जात असतांना लासूर येथील सचिन गुलाबराव सैंदाणे (31) याने व्यापारी संकुलातील शौचालयात नेऊन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलाच्या फिर्यादिवरुन संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.






अमळनेर न्यायालयात खटल्याचे कामकाज
हा खटला अमळनेर जिल्हा न्यायालयात सुरू होता. यात न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी आरोपीला कलम 377 नुसार सात वर्षे शिक्षा, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष कारावास, बालकाचे लैंगिक अत्याचार गुन्हे संरक्षण कायद्यानुसार 7 वर्षे शिक्षा, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष कारावास, अशी शिक्षा सुनावली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !