31 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या : जुने जळगावातील घटना


जळगाव : शहरातील जुने जळगाव परीसरातील तेली चौकातील तरुणाने दाराच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विजय नामदेव खडके (31) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

शनीपेठ पोलिसात नोंद
शहरातील जुने जळगावातील तेली चौकातील रहिवासी विजय नामदेव खडके (31) हा तरुण रेमंड कंपनीत नोकरीस होता. गेल्या काही वर्षांपुर्वी आजारपणामुळे त्याच्या आई-वडीलांचे निधन झाले आहे. त्यामुळे तो एकटाच घरात वास्तव्यास होता. शनिवारी सकाळच्या सुमारास विजय याने घराच्या दरवाज्याच्यावर असलेल्या खिडकीला दोरीच्या गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.






शनीपेठ पोलिसांची धाव
विजय याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश माळी, राहुल घेटे, परिस जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. विजय हा घरात एकटाच राहत होता. तसेच तो रेमंड कंपनीत नोकरीस असून त्याचा स्वभाव हा मनमिळावू होता. घराकडे देखील तो कोणाच्या अधिक संपर्कात नसल्याने त्याने गळफास घेतल्याचे समजताच अनेकांना धक्का बसला आहे. मयताच्या पश्चात तीन बहिणी आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !