विवाहितेचा विनयभंग : जळगावच्या आरोपीला एका महिन्यांची शिक्षा
जळगाव : दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपीला जळगाव न्यायालयाने एक महिन्याचा सश्रम कारावास आणि एक हजार रूपयांचा दंड सुनावला.
विनयभंग करीत केली शिविगाळ
‘शहरातील एका भागात एक दाम्पत्य राहते. 2017 मध्ये (नक्की तारीख माहित नाही) विवाहिता ही घरात एकटी असतांना आरोपी उमर शहा रोशन शहा (रा.जळगाव) याने महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला. विवाहितेने आरडाओरड केल्यानंतर विवाहितेचा पती पती धावत आला. विवाहितेला हात का लावला ?असा जाब विचारला असता आरोपी उमर शहा रोशन शहा याने महिलेच्या पतीला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती.





आरोपीचा गुन्हा झाला सिद्ध
या घटनेत नागरीकांनी आरोपी उमर शहा रोशन शहा याला रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.व्ही. मुगळीकर यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. शनिवार, 29 जानेवारी रोजी दुपारी या खटल्याने कामकाज झाले असता विवाहिता, विवाहितेचा पती आणि तपासाधिकारी काशिनाथ कोळंबे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. न्या.मुगळीकर यांनी आरोपीला दोषी ठरवत एक महिन्याचा सश्रम कारावास आणि 1 हजार रूपयांची दंड ठोठावला आहे. खटल्याकामी पैरवी अधिकारी राजेश भावसार, सहाय्यक अभियोक्ता रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले.
