मंदिरात चोरी करणारा भामटा अखेर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या जाळ्यात
पाचोरा : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी मंदिरातील मौल्यवान ऐवज लांबवणार्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पाचोरा तालुक्यातील सावखेडा भैरवनाथ मंदीरातून चोरट्याने दानपेटीतील पैसे, देवाच्या चांदीच्या छत्र्या व चैना लांबवल्या होत्या.
पोलिसात दाखल होता गुन्हा
सोमवार, 17 जानेवारी रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला सावखेडा बु.॥, ता.पाचोरा येथील भैरवनाथ मंदीरातून अज्ञात चोरट्याने रात्री कुलुप तोडून दानपेटीत पैसे व देवाच्या दोन किलो चांदीच्या छत्र्या व चैना चोरुन नेले होते. त्याप्रमाणे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.





गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
तपासात भैरवनाथ मंदीर सावखेडा बु.॥ येथून मिळालेल्या सी.सी.टी.व्ही.
फुटेजवरुन शुक्रवार, 28 जानेवारी 2022 रोजी गोपनीय माहिती मिळाल्यावरून भानुदास गंगाधर सोनवणे (30, कंकराळा, ता.सोयगाव) यास अटक करण्यात आली. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल चांदीच्या साखळ्या व छत्र्या हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, कॉन्स्टेबल रणजित पाटील, पोलीस नाईक अरुण राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, सचिन वाघ आदींनी केली. तपास सहाय्यक फौजदार विजय माळी करीत आहेत.
