जळगावात केवायसीच्या नावाखाली एकाची 74 हजारात गंडवले
जळगाव : मोबाईल सीमकार्ड केवायसीच्या नावाखाली एकाची 74 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
यशोधन अरुण व्यवहारे (46, रा.गणपती नगर, जळगाव) हे खाजगी नोकरी करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार, 27 जानेवारी रेाजी सायंकाळी 5 वाजता ते घरी असतांना त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मोबाईल सीमकार्डच्या केवायसीच्या नावाखाली कागदपत्रांची पुर्तता करण्याचे सांगून कस्टमर केअरला संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानुसार यशोधन व्यवहारे यांनी लागलीत दिलेल्या नंबरवर संर्क साधला असता अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर 10 रुपयांचे रीचार्ज करण्याचे सांगितले. यासाठी एक अॅप डाऊनलोड करण्याचे सांगितले. व्यवहारे यांनी अॅप डाऊनलोड केले व 10 रूपयांचे रीचार्ज केला. रिचार्ज केल्याने त्यांच्या बँक खात्यातून 10 रूपये कट झाले. काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून पाच वेळा पैस कट झाल्याचे मॅसेजेस आले. त्याची बँक डिटेल तपासले असता व्यवहारे यांच्या बँकखात्यातून एकूण 74 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे दिसून आले. त्यांनी तातडतीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक विजय खैरे करीत आहे.





