जळगावच्या तरुणाला नोकरीच्या आमिषाने दिड लाखांचा गंडा
जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील निमखेडी परीसरात राहणार्या 19 वर्षीय तरूणाला पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवत ऑनलाईन पध्दतीने एक लाख 48 हजार 573 रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नोकरीच्या आमिषाने फसवणूक
रोहन गजानन पाटील (19, रा.कल्याणी नगर, निमखेडी परीसर, जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता त्याला एका अनोळखी मोबाईल नंबरच्या टेलीग्रॉमवर सुरेंद्र नावाच्या व्यक्तीने पार्ट टाईम नोकरी लावण्याचे सांगितले. त्यानुसार जॉबची ऑर्डर पास करून देतो असे सांगून ऑनलाईन पध्दतीने पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार रोहनने फोन-पे अॅपच्या माध्यमातून एकूण एक लाख 48 हजार 573 रुपये ऑनलाईन पध्दतीने ट्रान्सफर केले. 7 डिसेंबरपर्यंत ह सुरूच होता. यात पार्ट टाईम नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तरूणाने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार संजय भालेराव करीत आहे.





