चोपडा शहरात टॅक्सी चालकास लूटले


चोपडा : चोपडा शहरातील बसस्थानकाजवळ टॅक्सी अडवून पाच जणांनी दमदाटी करत चालकाच्या खिशातून 6 हजार 300 रुपये जबरी चोरून नेले. या संदर्भात चोपडा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅक्सी चालकाच्या तक्रारीनुसार गुन्हा
चोपडा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हारुन शेख कमरुद्दोन शेख (52, रा.के.जी.एन.कॉलनी, चोपडा) हे टॅक्सी चालक आहे. टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 30 जानेवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ते चोपडा शहरातील बसस्थानकाकडून घरी जाण्यासाठी टॅक्सी क्रमांक (एम.एच.19 वाय. 0929) ने जात असताना त्यांना भैय्या पाटील, टकल्या गवळी (पुर्ण नाव माहित नाही) आणि सोबत असलेले अनोळखी तीन जण असे एकूण 5 जणांनी कार आडवून त्यांना दमदाटी केली. तर इतरांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या खिशातील 6 हजार 300 रूपयांची रोकड काढून चोरून नेली.






शहर पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी टॅक्सी चालक हारून शेख यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने संशयीत आरोपी भैय्या पाटील, टाकल्या गवळी आणि सोबत असलेले अनोळखी तीन जण यांच्याविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !