तळेगावातून पाच लाखांचा ऐवज लंपास : दोघे आरोपी जाळ्यात


चाळीसगाव : तालुक्यातील तळेगाव येथून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड मिळून पाच लाखांच्या ऐवज लांबवणार्‍या चाळीसगावातील दोघांच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संशयीतांकडून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तळेगावातील चोरीने उडाली खळबळ
चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील संतोष सुधाकर राठोड या शेतकर्‍यांच्या घरी 23 जानेवारी रोजी सकाळी 12 ते सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड 5 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात 24 जानेवारी रोजी फिर्याद दाखल करताच ग्रामीण पोलीसांनी चार दिवसात तपास करून अशोक चुनीलाल चव्हाण (32) व संदीप उर्फ सॅन्डी भीमसिंग चव्हाण (28, दोघेही रा.कृष्णा नगर, ता.चाळीसगाव) या आरोपींनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 4 लाख 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.






यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्थानकाचे सहा.निरीक्षक रमेश चव्हाण, सपोनि हर्षा जाधव, पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार, पोहेकॉ युवराज नाईक, पोना नितीन आमोदकर, पोना शांताराम पवार, गोर्धन बोरसे, पोना भुपेश वंजारी व प्रेमसिंग राठोड आदींनी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !