पाचोरा येथे तरूणाचा खून : तिघे पसार आरोपी जाळ्यात


पाचोरा : पाचोरा शहरातीळ २३ वर्षीय तरूणाचा क्षुल्लक कारणावरून चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार उर्वरित तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणात आता एकूण अटकेतील आरोपींवची संख्या आठ झाली आहे.

क्षुल्लक कारणावरून तरुणाचा झाला होता खून
३० रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात च्या दरम्यान शहराच्या पुनगाव रोड रस्त्यावरील बुर्‍हानी इंग्लिश मेडियम स्कूलच्या आवारात तरुणांच्या झालेल्या भानगडीत भुषण नाना शेवरे (23, रा. दुर्गा नगर, पाचोरा) या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकुन खून करण्यात आला होता. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील, राहूल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील आणि पवन (पुर्ण नाव मा‍हित नाही) यांच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचोरा पोलीसांनी संशयित आरोपी लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील यांना सोमवारी ३१ जानेवारी रोजी अटक केली होती. मंगळवारी उर्वरीत आरोपी राहूल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील आणि पवन (पुर्ण नाव मा‍हित नाही) यांना अटक अटक करण्यात आली.






आरोपींना न्यायालयाने सुनावली कोठडी
अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता आर. के. माने यांनी काम पाहिले आहे. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपक (आबा) पाटील व कोर्ट केसवाच म्हणुन पोलिस नाईक विकास सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !