जळगावातून एकाचा महागडा मोबाईल लांबवला


जळगाव : पिंप्राळा येथील भाजी बाजारातून एका तरूणाचा 43 हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल लांबवला. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजी बाजारातून मोबाईल लंपास
प्रशांत रामकृष्ण निखाडे (33, रा.देवराम नगर, कमला पार्क, जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. पिंप्राळा येथे बुधवारचा भाजी बाजार असल्याने ते सांयकाळी 6 वाजता भाजीपाला बाजारात आले होते. त्यावेळी त्यांच्या खिश्यातील 43 हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी त्यांनी रामानंदनगर पोलीसात धाव घेवून रात्री 11 वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !