जळगावात गोदाम फोडून 45 हजारांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला
जळगाव : शहरातील अजिंठा चौफुलीजवळील एका दुकानाचे गोडावून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून 45 हजार रूपये किंमतीच्या मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद गोदाम टार्गेट
ऋषीकेश गंगाराम चौधरी (34, रा.दत्त मंदीरजवळ खडके चाळ, शिवाजी नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी शहरातील अजिंठा चौफुलीजवळील सपना हॉटेलच्या पाठीमागे एक गोडावून भाड्याने घेतले होते. गोडावूनमध्ये त्यांनी तंबाखूच्या गोण्या, जलजिरा पावडर आणि मिस्क चहा पावडर आदी भरून ठेवले होते. नेहमीप्रमाणे 1 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता त्यांनी दुकानाचे शटर बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटर उचकावून गोडावूनमधील तंबाखूच्या गोण्या, जलजीरा पावड आणि मिस्क चहा पावडर असा 45 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे बुधवारी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उघडकीला आला.





अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध
ऋषीकेश चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. रात्री 9 वाजता ऋषीकेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार मिलिंद सोनवणे करीत आहे.
