चाळीसगावात सव्वानऊ लाखांचा अवैध गुटखा जप्त


चाळीसगाव : वाघळी ते हिंगोणे रोडवर पोलिसांनी सव्वानऊ लाखांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नाईक शांताराम सीताराम पवार तसेच पोलीस स्टाफ शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना अवैध गुटखा व पानमसाला पकडला असून 9 लाख 23 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अजय नारायण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.






गस्तीवर असताना कारवाई
गुरुवार, 3 जानेवारी 2022 रात्री 2 वाजेच्या सुमारास वाघळी ते हिंगोणे रोडवर पोना शांताराम सीताराम पवार व तसेच पोलीस स्टाफ असे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना अजय नारायण पाटील (रा. हनुमान वाडी, ता. चाळीसगाव) हा त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीच्या पांढरा रंगाचे गाडी क्र. एम. एच. 19 सीवाय 4148 याच्यात स्वतःच्या आर्थिक फायदा साठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मानवी आरोग्यास घातक अपायकारक असलेला तंबाखूजन्य सुगंधित गुटखा पदार्थाची अवैध वाहतूक करताना मिळून आला. यात 200 पाकिटे विमल पानमसाला तंबाखू व 5 लाख रुपये किंमतीचा एक पांढर्‍या रंगाची अशोक लेलँड कंपनीची चार चाकी गाडी असा एकूण 9 लाख 23 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोना शांताराम सीताराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अजय नारायण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक रमेश चव्हाण करीत आहेत.

ठए-ऊ -ङडज


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !