घरगुती गॅसचा काळाबाजार : एकाविरोधात गुन्हा
धरणगाव : धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील एका पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या टपरीत घरगुती गॅसचा रीक्षात भरून काळा बाजार करणार्या एकावर पाळधी पोलिसांनी छापा टाकून 52 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी पाळधी दुरक्षेत्र ठाण्यात (Paldhi Police Station) एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध रीफिलिंग पुन्हा ऐरणीवर
धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात असलेल्या खुबचंद पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या टपरीत घरगुती गॅसचा रीक्षासाठी काळ्या बाजारात विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्याचे (Paldhi Police Station) सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा (API Ganesh Buwa) यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने गुरूवार, 3 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता छापा टाकून घरगुती गॅसचे 17 सिलेंडर, इलेक्ट्रीक मोटार, वजन काटा असा एकुण 52 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.





पाळधी पोलिसात गुन्हा
याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात (Paldhi Police Station) संशयीत आरोपी अनिल शंकर सोनवणे (44) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा (api ganesh buwa) करीत आहे.
