जळगावात महिलेला 92 हजारांचा ऑनलाईन गंडा


जळगाव : शहरातील भगीरथ कॉलनीतील महिलेची 92 हजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फसवणुकीचा नवीन प्रकार उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, भगीरथ कॉलनीतील रहिवासी शीतल राजेश काबरा (42) या जळगाव शहरातील नवाल हॉस्पिटल येथे मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत. बुधवार, 2 फेब्रुवारी रोजी शीतल काबरा या घरी असताना त्यांच्या घरी रजिस्टर पोस्टाने एक बंद पाकिट आले. पाकीट उडत बघितले असता त्यात एक नापतोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पत्र क्रॅश कुपण कार्ड होते. कुपण कार्ड क्रॅश केले असता त्यात इंग्रजीत तुम्ही साडे सहा लाख जिंकले असुन ते मिळवण्यासाठी 19 आरयुबी असा एसएमएस कोड लिहलेला होता. क्रॅश कार्डनुसार रक्कम मिळण्यासाठी शीतल काबरा यांनी पत्रावरील हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधला. हेल्पलाईन नंबर बोलणार्‍या संबंधितांनी फोन करून वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स सांगून शीतल काबरा यांनी गूगल पे ने रक्कम पाठविण्यास सांगितले. अशाप्रकारे शितल काबरा यांनी एकूण 92 हजार रुपये पाठवले. मात्र क्रॅश कार्डनुसार कुठलेही रक्कम मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर शीतल काबरा यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जयंत कुमावत हे करीत आहेत.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !