बालकाचा कोरोनाने मृत्यू : जळगाव जिल्ह्यात नव्याने आढळले 122 रुग्ण


जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना सुसाट वेगाने पसरत असून दिवसागणिक वाढणार्‍या रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढतच आहे. जिल्ह्यात शुक्रवार, 4 फेब्रुवारी रोजी एकाच दिवसात तब्बल 122 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत 2588 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 588 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 51 हजार 104 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 46 हजार 750 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. शुक्रवारी 338 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात धरणगाव तालुक्यातील आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.






या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 38
जळगाव ग्रामीण 02
भुसावळ 07
अमळनेर 05
चोपडा 16
पाचोरा 18
भडगाव 02
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 06
जामनेर 06
रावेर 00
पारोळा 02
चाळीसगाव 20
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 00

भुसावळातील कोरोनावाढीचे हे समोर आले कारण
रेल्वेमुळे देशभरातील प्रवाशांचा भुसावळ शहरासोबत थेट संपर्क येतो. त्यामुळे शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने मुसंडी मारली आहे. तिसर्‍या लाटेतील पहिल्या रुग्णाला रेल्वेची ट्रॅव्हल हिस्ट्री होती. सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 50 ते 52 टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्णांना ट्रॅव्हल्स हिस्ट्री आहे. त्यापैकी काही रुग्ण रेल्वे संबधीत विभागातील बाधितांच्या संपर्कात आले आहेत. शहरातील दाट लोकवस्ती, नियमांकडे दुर्लक्ष यामुळेही रुग्णसंख्या वाढत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !