ट्रकवर दुचाकी आदळली : अपघातात जळगावातील तरुणाचा मृत्यू


जळगाव : भरधाव दुचाकी ट्रकवर आदळल्याने 36 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रवीण साईनदास पवार (36, रा.अयोध्या नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

ट्रकवर आदळली दुचाकी
प्रवीण पाटील हे आई, पत्नी, बहिण आणि मुलगा यांच्यासह अयोध्या नगरात वास्तव्यास होते शिवाय सुप्रिम कॉलनीत त्यांचे मेडीकलही होते. शुक्रवारी सायंकाळी ते मेडीकलवर जात असताना एमआयडीसीत वासुमित्रा हॉटेलजवळ थांबलेल्या ट्रकवर दुचाकी आदळली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अमलदार मुदस्सर काझी यांनी प्रवीण यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकांनी त्यांना तेथून खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्या मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !