सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार : भडगाव तालुक्यातील संतापजनक घटना
भडगाव : तालुक्यातील एका गावातील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली.
अत्याचाराने उडाली खळबळ
भडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणारी 6 वर्षीय बालिका आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरुवार, 3 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावातील संशयीत आरोपी विकास सिताराम पाटील याने गोड बोलून मुलगी खेळत असताना घरात नेत तिच्यावर अत्याचार केला. या संदर्भात पीडीत मुलीने नातेवाईकांना सांगितले. नातेवाइकांनी भडगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन पीडित मुलीचे आजोबा यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी विकास सीताराम पाटील यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे करीत आहे.





