जळगावात अपघातात मेडिकल चालकाचा मृत्यू : पोलिसात गुन्हा दाखल


जळगाव : भरधाव दुचाकी ट्रकवर आदळल्याने 36 वर्षीय मेडिकल चालक असलेल्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण साईनदास पाटील (36, रा.अयोध्या नगर) (pravin pawar) असे मयत तरूणाचे नाव आहे.

भरधाव दुचाकी ट्रकवर आदळली
प्रवीण  (pravin) हे आई, पत्नी, बहिण आणि मुलगा यांच्यासह अयोध्या नगरात वास्तव्यास होते. सुप्रिम कॉलनीत मेडीकल चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवार, 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते मेडीकलवर (एमएच 19 डीएम 3898) ने जात असताना एमआयडीसीत वासुमित्रा हॉटेलजवळ थांबलेल्या ट्रक (एमएच 19 झेड 872) वर दुचाकी आदळली. झालेल्या अपघातात प्रवीण पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अमलदार मुदस्सर काझी यांनी प्रवीण यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकांनी त्यांना तेथून खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत (death) घोषीत होते.






मयत दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
अपघात होताच नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. या अपघात प्रकरणी शनीवार 5 फेब्रुवारी रोजी रात्री पोलीस नाईक मुदस्सर काझी यांच्या फिर्यादीवरून मयत दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी (psi nilesh gosavi) करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !