बाटलीत पेट्रोल न दिल्याने अमळनेरात पेट्रोल पंप ऑपरेटरला मारहाण
अमळनेर : शहरातील शिव पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून ऑपरेटरला तिघांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा
शहरातील शिव पेट्रोल पंप येथे शनिवार, 5 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पेट्रोल पंप ऑपरेटर पंकज सुरसिंग वानखेडे (रा.झाडी, ता.अमळनेर) हा कामावर असतांना त्या ठिकाणी उमेश पाटील, यश पाटील आणि बाबू भगवान (पुर्ण नाव माहित नाही, सर्व रा.अमळनेर) हे दुचाकीने आले व बाटलीत पेट्रोल मागितले. त्यावर ऑपरेटर पंकज वानखेडे यांनी पेट्रोल देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने तिघांनी शिवीगाळ करून पंपावरील स्टीलचे भांडे ऑपरेटर पंकजच्या डोक्यात मारले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पंकज वानखेडे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी उमेश पाटील, यश पाटील आणि बाबू भगवान (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.





