पाळधीनजीक तरुणाचा अपघाती मृत्यू


जळगाव : द्वारकानगर येथील लग्नातील हळदीचा कार्यक्रम आटोपून जेवणासाठी पाळधी येथे गेलेल्या तरुणाचा भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 6 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 घडला. कारचालक कार सोडून पसार झाला आहे. याबाबत पोलिीसात अद्याप नोंद नसल्याचे समजते. गणेश सुखदेव महाजन (30, रा.द्वारका नगर, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.

कारच्या जबर धडकेत तरुणाचा मृत्यू
गणेश महाजन हा आपल्या आई-वडील, पत्नी व दोन मुलांसह द्वारका नगर येथे वास्तव्यास होता व गणेश महाजन हा महावितरण कंपनीत नोकरीला होता. द्वारका नगर परीसरात गणेशच्या मावस भावाचे लग्न असल्याने रविवार, 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम असल्याने जेवण करून कुटुंबासह सर्वजण आनंदाने नाचले. नाचण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री 10.30 वाजेच्या सुमारास गणेश नातेवाईकांसह मोठा भाऊ, पाहणे आणि मित्र परीवार यांच्यासोबत पाळधी येथे हॉटेलात जेवणासाठी गेले. पाळधी येथील हॉटेलमध्ये जेवण आटोपल्यानंतर गणेश हा त्याच्या मित्रासह आगोदर द्वारकानगर कडे रवाना झाले. हॉटेलपासून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर मागून भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सोबत असलेला मित्र जखमी झाला.






अपघातानंतर कार चालक वाहन सोडून पसार
कारचालक कार सोडून पसार झाला. गणेशचा मागून येणारा मोठा भाऊ किशोर महाजन याने रस्त्यावर कोणीतरी पडलेले दिसल्याने त्याचा मदत म्हणून थांबला परंतु दुसरे तिसरे कोणी नसून लहान भावाचा अपघात झाल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. गणेशच्या अचानक जाण्याने महाजन परीवारावर दुःखाचा डोंगर पसरला. गणेशच्या पश्चात आई- वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, मोठा भाऊ वहिनी असा परीवार आहे. पाळधी पोलिसांनी कार जप्त केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !