एरंडोल तालुक्यातील तरूणाची आत्महत्या
जळगाव : एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील 23 वर्षीय तरूणाने शेतातच झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली. याबाबत शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नितीन शालिग्राम पाटील (23, रा.वैजनाथ, ता.एरंडोल) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही.
झाडाला घेतला गळफास
याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील वैजनाथ येथील नितीन शालीग्राम पाटील हा तरुण कुटुंबियांसोबत वासव्यास आहे. त्याचा मोठा भाऊ पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला असून नितीन हा घरी वडीलांना शेतीकामात मदत करीत होता. शेतात रात्रीची लाईट असल्याने नितीन हा रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. आज सोमवार, 7 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारास नितीनचे काका भगवान पाटील हे त्यांच्या शेतात गेल्याने त्यांना नितीनने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती आपल्या भावाला दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत नितीनचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी त्याची तपासणी केली असता, त्याला मयत घोषीत केले. मयत नितीनच्या पश्चात त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, विवाहित बहिण असा परीवार आहे.





