गॅस भरताना अमळनेरात कार पेटली
अमळनेर : खाजगी चारचाकी कारमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरत असताना अचानक आग लागून कार पूर्णपणे खाक झाली. ही घटना मंगळवारी दुपारी शहरातील बसस्थानकाच्या बाजूला घडली.
गॅस भरताना पेटली कार
अमळनेर शहरातील बसस्थानकाच्या बाजूला जुन्या पोलि लाईनजवळ व चोपडा रस्त्याच्या बाजूस वाहने दुरूस्ती करण्याचे दुकाने आहेत. याठिकाणी दुरूस्तीच्या कामांसह चारचाकी वाहनांमध्ये विना परवाना गॅस भरला जात असताना मंगळवारी दुपारी एका ओम्नी या चारचाकी वाहनात गॅस भरण्याचे काम सुरू असतांना अचानक गॅस गळती होवून आग लागली. काही कळण्याच्या आता उभी कारने पेट घेतली. यात आगीत संपुर्ण कार जळून खाक झाली. अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारे आग विझविण्यात आली.





