जळगावात एकतर्फी प्रेमाला तरुणीने नकार देताच तरुणाने कापली हाताची नस
जळगाव : जळगाव शहरातील एका तरुणाने प्रेमभंग झाल्याने ‘प्रपोज डे’ च्या (prapose day) दिवशी तरुणीसमोरच आपल्या हाताची नस कापून घेतल्याची घटना फुले मार्केटमध्ये (jalgaon fule market) बुधवारी घडल्याने मार्केट परीसरात चांगलीच खळबळ उडाली.
प्रेमभंग सहन न झाल्याने कापली हाताची नस
जळगावातील एका तरुणाला तरुणीने नकार कळवला. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणाने बुधवार, 9 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता शहरातील फुले मार्केटमध्ये ब्लेडने स्वत:च्या हाताची नस कापली. यावेळी ज्या तरुणीवर त्याचे प्रेम होते ती देखील समोर उभी होती. तिच्याकडे पाहत असतानाच त्याने नस कापल्यामुळे या तरुणीला चांगलाच धक्का बसला. हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे फुले मार्केट परीसरात चांगलीच खळबळ उडाली.





