भुसावळातील गुन्हेगारीचे उच्चाटन होणे काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील


भुसावळ : भुसावळात शहरा गुन्हेगारी वाढली असून त्याचे उच्चाटन होणे काळाची गरज असून येथे पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांवर हात उचलणारे लोक आहेत त्यांचा बंदोबस्त गरजेचा असून शहरासाठी आपण आयपीएस दर्जाचा अधिकार्‍याची मागणी केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिली.शहरात सहा कोटी 22 लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ शनिवारी त्यांच्याहस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा विकासाची जवाबदारी
गुलाबराव पाटील म्हणाले की, पालकमंत्री हा एका तालुक्याचा नसून संपूर्ण जिल्ह्याचा असल्याने जवाबदारी अधिक वाढली असून जळगाव जिल्हा विकासाचा जिल्हा व्हावा यासाठी आपले अधिक प्रयत्न असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिली.



यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, प्रशासक तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !