बंद कारमध्ये विवस्त्र अवस्थेतील मयत प्रेमी युगुल आढळले ; या शहरातील धक्कादायक घटना
औरंगाबाद : नग्न अवस्थेतील प्रेमी युगुल मृतावस्थेत आढळल्याची घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. एसीचा स्फोट झाल्याने ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरालगतच्या गांधेली शिवारात बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसून कारमधील एसीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मोकळ्या जागेत आढळली कार
शहरालगतच्या गांधेली शिवारात सहारा सिटीचे काम सुरु आहे. याच्या पाठीमागे मोकळ्या जागेत एक कार बेवारस आढळून आली होती. कारची तपासणी केली असता त्यात आक्षेपार्ह स्थितीत प्रेमी युगुल मृतावस्थेत आढळून आले. दोघांची वय चाळीस वर्षांपर्यंत असून अद्याप त्यांची ओळख पटली नाही. कारच्या सर्व काचा बंद असल्याने त्यातील एसीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चिखलठाणा पोलिसांची धाव
माहिती मिळताच चिखलठाणा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्यानंतर दोन्ही मृतदेह घाटी रुग्णालयात हलविण्यात आली आहेत. कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
