भुसावळात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमीत्त रेल्वेतर्फे रन ऑफ युनिटी रॅली


भुसावळ : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे भुसावळ येथे गुरूवारी सकाळी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वात रन ऑफ युनिटी रॅली डीआरएम कार्यालय ते जळगाव नाक्यापर्यत रॅली काढण्यात आली. या रॅलीला सकाळी 7.30 वाजता डीआरएम गुप्ता यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. ही रॅली डीआरएम कार्यालयापासून सुरू होवून गांधी पुतळा, पंचमुखी हनुमान मंदिरावरून जळगाव नाक्याजवळील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यत आणण्यात आल्यानंतर डीआरएम गुप्ता, एडीआरएम मनोजकुमार सिन्हा यांनी माल्यार्पण केले. यावेळी वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक आर.के. शर्मा, वरीष्ठ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, वरीष्ठ मंडळ यांत्रीक अभियंता रामचंद्रन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शाखा अभियंता, रेल्वे स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, स्काऊट गाईडचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.

राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
रॅली आटोपल्यावर डीआरएम कार्यालयात डीआरएम गुप्ता यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसानिमीत्त शपथ दिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर डीआरएम कार्यालयातील कर्मचार्‍यांनी उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !