मोठी बातमी ! : मोबाईल वा अन्य वस्तू हरवल्यास दाखल होणार गुन्हा
तक्रारदाराला माघारी फिरवल्यास ठाणे अंमलदारासह प्रभारी अधिकार्यावर होणार कठोर कारवाई
Mumbai Police Chief Sanjay Pandey मुंबई : मोबाईल अथवा अन्य वस्तू गहाळ वा चोरी झाल्यास हरवल्याची किंवा मिसिंगची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल केली जात होती, मात्र आता मोबाईल अथवा अन्य वस्तू गहाळ वा चोरी झाल्यास या संदर्भात थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Chief Sanjay Pandey) यांनी दिले आहेत.
हलगर्जीपणा केल्यास होणार कारवाई
पूर्वी कोणतीही वस्तू गहाळ चोरी झाल्यास त्याची तक्रार पोलिसात मिसिंग रजिस्टरमध्ये नोंद केली जात होती, परंतु आता संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकार्यांना तक्रारदाराची तक्रार एफआयआर दाखल करावी लागणार आहे. एफआयआर नोंदविण्यात हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकार्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे निर्देश मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Chief Sanjay Pandey) यांनी दिले आहेत.
नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसला अपघात : 24 तासानंतर डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत
मिसिंग रजिस्टर होणार बंद
एकाद्या व्यक्तीने मोबाईल चोरी वा हरविल्याची तक्रार दिली तर मोबाईल चोर अन्य जिल्ह्यात किंवा दुसर्या राज्यात फरार झाला आणि मोबाईल विकल्यास फार फार तर 10 हजाराहून कमी किंवा जास्त किंमत मिळते, त्यामुळे अशा तक्रारीसाठी अधिकारी पदरमोड करून सखोल तपासासाठी जातच नाहीत, त्यामुळे मोबाईल चोरांचे जास्तच फावते, परंतु आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Chief Sanjay Pandey) यांच्या निर्देशानुसार आता पोलीस अधिकारी कर्मचार्याना मिसिंग तक्रार ऐवजी गुन्हा दाखल करून तपास करावा लागणार आहे त्यामुळे गुन्हेगारीवर आपसुकच अंकुश बसणार आहे.
भुसावळातील बारागाड्या दुर्घटना : मृतावर अंत्यसंस्कार


