शरदचंद्र पवार यांच्या घरावर हल्ला करणार्यांवर हवी कठोर कारवाई
बोदवड पोलिस निरीक्षकांना राष्ट्रवादी पदाधिकार्यांचे निवेदन
बोदवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या बंगल्यावर भ्याड हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. हल्लेखोरांमागे कोणती राजकीय शक्ती आहे याचा तत्काळ शोध घेवून त्यातील मुख्य सूत्रधाराला गजाआड करावे व हल्लेखोरांना कठोर शासन करावे, अशी मागणी बोदवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांसह पदाधिकार्यांनी बोदवड पोलिस निरीक्षकांना निवेदन देवून केली. यावेळी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
फैजपूरातून अपहरण केलेल्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : आरोपीला अटक
निवेदन देताना यांची होती उपस्थिती
निवेदन देताना जिल्हा दुध संघ संचालक मधुकर राणे, तालुका कार्याध्यक्ष निलेश पाटील, शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, माजी सभापती किशोर गायकवाड, माजी नगरसेवक कैलास चौधरी, नगरसेवक भरत पाटील, दीपक झांबड, हकीम बागवान, शे.लतीफभाई, मुज्जम्मील शहा, किशोर पाटील, विनोद पालवे, कडू माळी, कल्पेश शर्मा, किरण वंजारी, रवींद्र खेवलकर, दीपक वाणी, नईम बागवान, निलेश माळी, शालिग्राम काजळे, विलास देवकर, संजय वराडे, वामनराव ताठे, ज्ञानेश्वर पाटील, सतीश पाटील, प्रमोद धामोळे, भागवत टिकारे, जीवन राणे, दिलीप पोळ, विनोद कोळी, आनंदा पाटील, अमृत पटेल, प्रफुल्ल लढे, नितीन चव्हाण व महिला आघाडी तालुकाध्यक्षा वंदना पाटील, नगरसेविका योगीता खेवलकर, शहराध्यक्षा प्रतिभा खोसे, शहर उपाध्यक्षा कविता गायकवाड व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


सिल्व्हर ओकवर हल्ला : पडद्यामागील सूत्रधार समोर आणण्याची रावेरात मागणी
शरद पवारांच्या घरावर हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
