रावेर तालुक्यातील 19 गावातील 24 जागांसाठी पोटनिवडणूक
16 ते 21 दरम्यान निवडणूक प्रक्रिया : खिर्डी बु.॥ येथे सरपंच पदासाठी निवडणूक
रावेर : तालुक्यातील खिर्डी बु.॥ गावात सरपंच पदासाठी तर 19 गावांमधील 24 रीक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत असल्याची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले दिली. नामनिर्देशन व निवडणूक कार्यक्रम 16 ते 21 दरम्यान असणार आहे.
या गावांमध्ये होणार पोटनिवडणूक
तहसील प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तासखेडा व कुसुंबा बु.॥ येथे दोन जागांसाठी, रायपूर येथे तीन जागांसाठी तर गहुखेडा, रणगाव, मस्कावद खुर्द, सुनोदा, शिंगाडी, कोळोदा, मोरगाव खुर्द, नेहते, सावखेडा बु.॥, गोरखेडा, खिर्डी बु.॥ , सहस्त्रलिंग, धुरखेडा, खिरवड, नांदुरखेडा व पुनखेडा येथे प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.



