चार लाखांच्या मुद्देमालासह दोघे जाळ्यात : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कामगिरी


चाळीसगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील तळेगाव तांडा येथील साडेपाच लाखांचा घरफोडीची उकल करीत दोघांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

घरफोडी प्रकरणी दाखल होता गुन्हा
चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव तांडा येथील रहिवासी संतोष सुधाकर राठोड (23) हे आपल्या कुटुंबियांसह 12 जानेवारी 2022 नातेवाईकांकडे लग्नाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून एकूण 5 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी 24 जानेवारी रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी अशोक चुनीलाल चव्हाण (32) आणि संदीप उर्फ सॅन्डी भीमसिंग चव्हाण (28, दोन्ही रा.कृष्ण नगर, तांडा तळेगाव, ता.चाळीसगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालापैकी चार लाख 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

मूळ फिर्यादीला मुद्देमाल परत
दोन्ही आरोपींकडून घरफोडीतील चोरीस गेलेल्या रकमेपैकी चार लाख 200 रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार मुळ फिर्यादी संतोष राठोड यांना परत करण्यात आला.

यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सूचनेनुसार हवालदार युवराज नाईक, नितीन अमोदेकर, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार यांनी कारवाई करीत दोन्ही संशयीत आरोपींना अटक केली.


कॉपी करू नका.